भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेव्हाराच्या ठाई । तुझें न चले कांहीं । मी तूं दोघे पाहीं । सरिसें तेथें

vevharachya thai | tujhen na chale kanhin | mi tun doghe pahin | sarisen tethen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेव्हाराच्या ठाई । तुझें न चले कांहीं । मी तूं दोघे पाहीं । सरिसें तेथें ॥१॥ ठेविलें बुडविसी । शेखी जाबही न देसी । ऐकोन नायकसी । गहिंसपणें ॥२॥ खवळलों तरी जाण गिळीन मीतूंपण । तेथें देवपण । उडवीन तुझें ॥३॥ जो सांगे पांचापाशीं । त्याचें तोडं तूं धरिसी । ठकडा कैसा होसी । म्हणे एका जनार्दनीं ॥४॥