भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेष पालटोनी देव कुंभार पैं जाहले । गरुडासी केलें गाढव तेव्हां

vesh palatoni dev kumbhar pain jahale | garudasi kelen gadhav tevhan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेष पालटोनी देव कुंभार पैं जाहले । गरुडासी केलें गाढव तेव्हां ॥१॥ येऊनियां तेरें पुसतसे लोकां । कुल्लाळ तो देखा गोरा कोठें ॥२॥ आम्ही परदेशी जातीचे कुंभार । नाम विठु साचार मज म्हणती ॥३॥ एका जनार्दनीं गोरियाचिया वाडां । आलासे उघडा देवराव ॥४॥