भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

वृक्ष पाहतां परतला आगम । निगमा न कळे दुर्गम । वेदशास्त्रांसी निरुतें वर्म । तो वृक्ष देखिला विठ्ठलनाम ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

वृक्ष व्याला आकाश पाताळ । वृक्षीं प्रसवलें लोकपाळ । आठ्ठ्यायेंशीं सहस्त्र ऋषिमंडळें ॥१॥ कान्होबा बोलों तुझें कोडें । अर्थ ऐकतां ब्रह्मा जोडें । अभक्त होती केवळ वेडे रे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेद घेऊनियां गेला शंखासुर । मत्स्य अवतार जयालागीं ॥१॥ तोचि महाराज भिवरेचे तटीं । उभा जगजेठी विटेवरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेद तो आम्हां जनार्दन । शास्त्र तें आम्हां जनार्दन । पुराण जनार्दन । सर्वभावें ॥१॥ सुख जनार्दन । दुःख जनार्दन । कर्म धर्म जनार्दन । सर्वभावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेदवचनें सुतक पावे । ब्रह्मा म्हणतां ब्रह्म नव्हें ॥१॥ वेद न कळेंचि साचार । देहबुद्धिं अविचार ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेदविधि कांही न कळे पाठका । गुणदोष देखा मलीन सदा ॥१॥ दशग्रंथीं ज्ञान होतांचि जाण । निंदितो देखोन भलत्यासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेदशास्त्र पुराणें अनेक शब्दज्ञानें । भारताचे श्रवणे सर्वस्व जोडे ॥१॥ ते सव्वालक्ष भारत जोडे पैं सुकृत । तेंचि गीते सात शतें प्राप्त होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेदशास्त्र वक्ता अति निःसीम पाही । सिद्धान्त बोलतां उरीं ठेवी कांहीं । लयलक्ष ध्यान मुद्रा दावी आपुलें ठायीं । वेडे वेडे चार करितां मोक्ष न ये हातां ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

वेदशास्त्रीं गाईला पुराणीं वर्णिला । तो शिव पाहिला डोळेभरीं ॥१॥ तेणें माझ्या मना होय समाधान । आठवितो चरण वेळोवेळीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेदांचा विवेक शास्त्रांचा हा बोध । तो ह परमानंद विठ्ठलमूर्ती ॥१॥ पुराणासी वाड साधनांचे कोड । ते गोडांचे गोड विठ्ठलमूर्ती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ