भजनी मालिका
← भजनांकडे परत

विसर तो अवघा जाहला । विठ्ठला पाहतां

visar to avagha jahala | viththala pahatan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विसर तो अवघा जाहला । विठ्ठला पाहतां ॥१॥ निवारला क्रोधकाम । जाहला तम शांत तो ॥२॥ इंद्रियाची होती चाली । निवांत राहिली एकरुप ॥३॥ दुजेपणाचा भेद गेला । एका ठेला जनार्दनीं ॥४॥