भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेद घेऊनियां गेला शंखासुर । मत्स्य अवतार जयालागीं

ved gheuniyan gela shankhasur | matsya avatar jayalagin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेद घेऊनियां गेला शंखासुर । मत्स्य अवतार जयालागीं ॥१॥ तोचि महाराज भिवरेचे तटीं । उभा जगजेठी विटेवरी ॥२॥ घेउनी अवतार वेद आणियेले । ब्रम्हासी स्थापिलें ब्रम्हपुरीं ॥३॥ शंखासुर वधुनी विजयी पैं झाला । वर्णितां पैं धाला जनार्दन ॥४॥