भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदशास्त्रीं गाईला पुराणीं वर्णिला । तो शिव पाहिला डोळेभरीं

vedashastrin gaila puranin varnila | to shiv pahila dolebharin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेदशास्त्रीं गाईला पुराणीं वर्णिला । तो शिव पाहिला डोळेभरीं ॥१॥ तेणें माझ्या मना होय समाधान । आठवितो चरण वेळोवेळीं ॥२॥ सकळ इंद्रियां झालीं पैं विश्रांती । पाहतां ती मूर्ती शंकराची ॥३॥ एका जनार्दनीं शिव हा भजावा । संसार करावा सुखरुप ॥४॥