भजनी मालिका
← भजनांकडे परत

विसरुनी विठोबासी । भरले हव्यासी साधन

visaruni vithobasi | bharale havyasi sadhan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विसरुनी विठोबासी । भरले हव्यासी साधन ॥१॥ काय त्यांचा कले मंत्र । कोण पवित्र म्हणे तयां ॥२॥ दाविती वरी वरी भक्ति । अंतरीं युक्ति वेगळीच ॥३॥ एका जनार्दनीं जप । वाउगें तप करितो ते ॥४॥