भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

आजी नवल झालें वो माय । पाहण्या पाहण्या पाहणें दृष्टी धाये ॥१॥ ऐसा लाघवी सुखकर मूर्ती । संतसंगे जाली मज विश्रांती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आजी नीलवर्ण कुसुमसम । देखिला मेघ शाम विटेवरी ॥१॥ अतसीकुसुम रंग रंगला श्रीरंग । भोंवाता शोभे संग संतजन ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आजी मी तयाचे न पाहतां चरण । देईन आपुला प्राण याचिक्षणीं ॥१॥ जाणोनी निर्धार सांवता बोले त्यासी । ह्रदयनिवासी आत्माराम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आजी वो कां हो कृष्ण नाहीं आला । म्हणोनि खेद करी गौळणी बाळा । काय हो ऐसा देहीं लागला चाळा । कां रे न येसी बाळा नंदाचिया ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

आजीचा सुदीनु आम्हां झाला आनंदु । सकळां स्वरुपीं स्वयें देखें गोविंदु ॥१॥ पाहिला गे माय आतां सांगुं मी कैसें । जेथें पाहे तेथेंक गोविंदु दिसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आठ दिवसांची ऐवजाची बोली । आहे ते नेमिली नामा सांगे ॥१॥ सांगोनियां नामा राउळासी आला । वृत्तांत सांगितला विठोबासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आठवा आठवा वेळोवेळा आठवा । श्रीकृष्ण आठवा वेळोवेळां ॥१॥ कलीमाजीं सोपें आठवा आठवण । पावन तो जन्म आठव्यानें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आठवी गोविंद वेळोवेळी वाचें । तेणें या देहांचे सार्थक होय ॥१॥ विठ्ठल विठ्ठल मनीं निरंतर साचा । काय मने वाचा छंद त्यांचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आणविल्या सर्व गांवींच्या युवती । नुचलें कल्पांती विमान तें ॥१॥ आतां यासी काय करावा उपाय । येरु म्हणती पाहे ग्रामामाजीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आणिक एक चमत्कार । जेव्हा उद्वस अलंकापूर । तेव्हां रंकांसी आदर । ज्ञानेश्वरें केला ॥१॥ वाणी होउनी आपण । प्रत्यक्ष मांडिलें दुकान । अन्न उदक तृप्त जाण । सर्वही केलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आणिक तें आम्हां न दिसे प्रमाण । कीर्तनावांचून आनु नेणों ॥१॥ राम कृष्ण हरि विठ्ठल उच्चार । करुं हा गजर वाहुं टाळी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ