भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजी देखिलीं पाउलें । तेणें डोळे धन्य जाहले

aji dekhilin paulen | tenen dole dhanya jahale

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आजी देखिलीं पाउलें । तेणें डोळे धन्य जाहले ॥१॥ मागील शीणभारु । पाहतां न दिसे निर्धारु ॥२॥ जन्मांचें तें फळ । आजी जाहलें सुफळ ॥३॥ एक जनार्दनीं डोळा । विठ्ठल देखिला सांवळा ॥४॥