भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजी सुदिन आम्हांसी । संतसंग कैवल्यराशी

aji sudin amhansi | santasang kaivalyarashi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आजी सुदिन आम्हांसी । संतसंग कैवल्यराशी ॥१॥ हेंचि आमुचें साधन । आणिक नको आम्हां पठण ॥२॥ वेदश्रुति पुराण मत । संतसेवा तें सांगत ॥३॥ जाणोनि विश्वासलों मनीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥