भजनी मालिका
← भजनांकडे परत

आडक्या कारणें जीव जात । म्हणती आम्ही उदार भक्त

adakya karanen jiv jat | mhanati amhi udar bhakta

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आडक्या कारणें जीव जात । म्हणती आम्ही उदार भक्त ॥१॥ ऐसिया दांभिकांसी । दुरी होय हरी त्यांसी ॥२॥ गाजराची तुळा साची । वाट पाहाती विमानाची ॥३॥ एका जनार्दनीं खोटा भाव । तयासी न भेटे देव ॥४॥