भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजी धन्य दिन जाला । स्बामी निवृत्ति भेटला

aji dhanya din jala | sbami nivrutti bhetala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आजी धन्य दिन जाला । स्बामी निवृत्ति भेटला ॥१॥ जन्म जरामरण व्याधी । अवघी तुटली उपाधि ॥२॥ मन इंद्रियांसहित । पायीं जडियेलें चित्त ॥३॥ समूळ अहंकार गेला । निवृत्तिनाथ पाहतां डोळां ॥४॥ एका विनवी जनार्दन । निवृत्तिनामें जालों पावन ॥५॥