भजनी मालिका
← भजनांकडे परत

आठवण ती हीच असो । वाचे वसो हरिनाम

athavan ti hich aso | vache vaso harinam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आठवण ती हीच असो । वाचे वसो हरिनाम ॥१॥ काया वाचा आणि मन । करुं कीर्तन धुमाळी ॥२॥ धरुं वैष्णवांचा संग । टाकूं कुसंग लाजोनी ॥३॥ म्हणूं आम्ही हरीचे दास । एका जनार्दनीं निजदास ॥४॥