भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजीचा सुदीनु आम्हां झाला आनंदु । सकळां स्वरुपीं स्वयें देखें गोविंदु

ajicha sudinu amhan jhala anandu | sakalan svarupin svayen dekhen govindu

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आजीचा सुदीनु आम्हां झाला आनंदु । सकळां स्वरुपीं स्वयें देखें गोविंदु ॥१॥ पाहिला गे माय आतां सांगुं मी कैसें । जेथें पाहे तेथेंक गोविंदु दिसे ॥२॥ पाहतां पाहणें तटस्थ ठेलें । सबाह्म अभ्यंतरीं पुरुषोत्तम कोंदलें ॥३॥ यापरी पाहतां हरुष होतसें मना । एका जनार्दनीं धणी न पुरे मना ॥४॥