भजनी मालिका
← भजनांकडे परत

आठवा आठवा वेळोवेळा आठवा । श्रीकृष्ण आठवा वेळोवेळां

athava athava velovela athava | shrikrushna athava velovelan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आठवा आठवा वेळोवेळा आठवा । श्रीकृष्ण आठवा वेळोवेळां ॥१॥ कलीमाजीं सोपें आठवा आठवण । पावन तो जन्म आठव्यानें ॥२॥ आठवा नामें तरी पांडवा सहाकारी । दुराचारियां मारी आठवा तो ॥३॥ एका जनार्दनीं आठव्याची आठवण । हृदयीं सांठवण करा वेंगीं ॥४॥