भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

पतनाच्या भया नोळखे पामर । करी वेरझार नानापरी ॥१॥ नायके कीर्तन न पाहे पंढरी । वैष्णवाचे दारीं न जाये मूढ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पतित पातकी खळ दुराचारी । पाहतां पंढरी मोक्ष तयां ॥१॥ स्वमुखं भक्तां सांगतों आपण । नका अनुमान धरुं कोणी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पतितपावन नाम श्रीविठ्ठलाचें । आणिक मी साचें नेणें कांहीं ॥१॥ पतितपावन नाम वाणी । विठ्ठलांवांचुनी कांहीं नेणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पतिव्रता सती उठोनि सकाळीं । शेजारिणी सदनीं येती जाहली ॥१॥ अहो माते पती जाती कृष्ण दरुशना । कांही तरी धान्य देईं मज ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पतीतपावन केलें असें संतीं । पुराणीं ती ख्याती वर्णियेली ॥१॥ सदोषी अदोषी तारिलें अपार । हाचि बडिवार धन्य जगीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पंधरा भागले सोळांसी न कळे । सतरा वेडावले न कळे माय ॥१॥ एकुणवीस भले विसांतें पुसती । तयांसी ती गति न कळे गे माय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

परपश्यंती मध्यमा वेगळा । वैखरीये निराळा शिव जाणा ॥१॥ आदि मध्य अंत न कळे रुपाचा । परता चहूं वांचा शिव जाणा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

परब्रह्मा पुतळा कौस्तुभ गळां । वैजयंती माळा कंठीं शोभे ॥१॥ शंख चक्र गदा पद्म शोभा करीं । पीतांबरधारी चतुर्भुज ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

परब्रह्मा मूर्ति विठ्ठल विटेवर । चंद्रभागेतीरीं उभा असे ॥१॥ तयाचे चरण आठवी वेळो वेळां । सर्व सुख सोहळा पावशील ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

परब्रह्मा सगुण असे परात्पर । वेदादिकां पार न कळे ज्याचा ॥१॥ पाहतां पाहतां वेधलेसें मन । नये अनुमोदन शास्त्रादिकां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

परब्रह्मा सांवळा खेळे यमुना तीरीं । सर्वें घेउनी गायी गोपवत्स नानापरी ॥१॥ कान्होबा यमुनेसी जाऊं । आदरें दहीभात खाऊं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

परमर्थीं राखितां भावो नवल नव्हे पहाहो । भक्त परिग्रहो चालवी दत्तदेवो ॥१॥ कृपाळु श्रीदत्त कृपाळु श्रीदत्त । अहर्निशीं स्वयें पाळिती निजभक्त ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

परमार्थ सोयरा अहोरात्र करीं । गाई निरंतरी रामकृष्ण ॥१॥ नरदेहा यातना चुकतील फेरे । वायां हावभरी होऊं नको ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ