भजनी मालिका
← भजनांकडे परत

पतनाच्या भया नोळखे पामर । करी वेरझार नानापरी

patanachya bhaya nolakhe pamar | kari verajhar nanapari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पतनाच्या भया नोळखे पामर । करी वेरझार नानापरी ॥१॥ नायके कीर्तन न पाहे पंढरी । वैष्णवाचे दारीं न जाये मूढ ॥२॥ नानापरीचे अर्थ दाखवी वोंगळ । सदां अमंगळ बोले जना ॥३॥ हिंडे दारोदारीं म्हणे पुराणिक । पोटासाठी देख सोंग करी ॥४॥ वाचळ आगाळा बोलों नेदी लोकां । एका जनार्दनीं देखा फजीत होय ॥५॥