भजनी मालिका
← भजनांकडे परत

परब्रह्मा सांवळा खेळे यमुना तीरीं । सर्वें घेउनी गायी गोपवत्स नानापरी

parabrahma sanvala khele yamuna tirin | sarven gheuni gayi gopavatsa nanapari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
परब्रह्मा सांवळा खेळे यमुना तीरीं । सर्वें घेउनी गायी गोपवत्स नानापरी ॥१॥ कान्होबा यमुनेसी जाऊं । आदरें दहीभात खाऊं ॥२॥ नाचती गोपाळ एक एकाच्या आवडी । परब्रह्मा सांवळा पहातसे संवगडी ॥३॥ एका जनार्दनी ब्रह्मा सारांचे सार । धन्य भाग्य गौळियांचे कृष्ण खेळे परिकर ॥४॥