भजनी मालिका
← भजनांकडे परत

परब्रह्मा मूर्ति विठ्ठल विटेवर । चंद्रभागेतीरीं उभा असे

parabrahma murti viththal vitevar | chandrabhagetirin ubha ase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
परब्रह्मा मूर्ति विठ्ठल विटेवर । चंद्रभागेतीरीं उभा असे ॥१॥ तयाचे चरण आठवी वेळो वेळां । सर्व सुख सोहळा पावशील ॥२॥ अविनाश सुख देईल निश्चयें । करी पा लवलाहेंलाहो त्याचा ॥३॥ श्रीविठ्ठलचरणीं शरण तूं जाई । एका जनार्दनीं पाही अनन्यभावें ॥४॥