भजनी मालिका
← भजनांकडे परत

परब्रह्मा सगुण असे परात्पर । वेदादिकां पार न कळे ज्याचा

parabrahma sagun ase paratpar | vedadikan par na kale jyacha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
परब्रह्मा सगुण असे परात्पर । वेदादिकां पार न कळे ज्याचा ॥१॥ पाहतां पाहतां वेधलेसें मन । नये अनुमोदन शास्त्रादिकां ॥२॥ एका जनार्दनी व्यापुनी वेगळा । त्यासी गौळणी बाळा झकविती ॥३॥