भजनी मालिका
← भजनांकडे परत

पतितपावन नाम श्रीविठ्ठलाचें । आणिक मी साचें नेणें कांहीं

patitapavan nam shriviththalachen | anik mi sachen nenen kanhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पतितपावन नाम श्रीविठ्ठलाचें । आणिक मी साचें नेणें कांहीं ॥१॥ पतितपावन नाम वाणी । विठ्ठलांवांचुनी कांहीं नेणें ॥२॥ पतीतपवान नामें तारिली गणिका । अजामेळ देखा सरता केला ॥३॥ पतितपावन नाम जनीं वनीं । एका जनार्दनीं नाम वाचे ॥४॥