भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

निर्धारे नेमेंसी करी एकादशी । तृणजीवन पशूंसी घेऊं नेदी ॥१॥ राष्ट्रामाजीं रुढी केली हरिभक्ती । दया सर्वांभूतीं समानची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निर्लज्ज होऊनि नाचे महाद्वारी । वाचें वदे हरी सर्वकाळ ॥१॥ व्रत करी सदा नामाचें पारणें । अखंड तें तेणें रामकृष्ण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निळा पंढरपूरचा लावण्यपुतळा । देखिलासे डोळां विठ्ठल देव ॥१॥ जीव वेधला वो वेधला वो । पाहतां पाहतां जीव वेधला वो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निळी कांच भूमीं खेळे वनमाळी । पाहिलें प्रतिबिंब कृष्णं तया न्याहाळीं ॥१॥ रडूं घेतलें रडूं घेतलें । समजावी यशोदा परी रडूं घेतलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निवंत बैसोनि सुखें गाय नाम । भेदाभेद काम परते सांडी ॥१॥ हेचि एक खुण परमार्थ पुरता । मोक्ष सायुज्यता हातां चढे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निवांत बैसें तूं अचळ । मन करुनी निश्चळ । नको कांहीं तळमळ । नाम गाय सर्वदा ॥१॥ सोडीं मागिलाची आस । दृढ मना घालीं कास । भक्तिभाव समरस । रामनामीं तूं धरीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निवांत श्रीमुख पहावें डोळेभरी । तेणें नुरे अंतरीं इच्छा कांहीं ॥१॥ चरणीं ते मिठी घालावे दंडवत । तेणें पुरे आर्त सर्व मनींचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निवांतपणें मना चित्तीं तूं चरण । आणिक कल्पना न करीं कांहीं ॥१॥ चिंतीं पां विठ्ठल कायावाचामनें । संसारबंधन तुटेल तेणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निवृत्ति निवृत्ति । म्हणतां पाप नुरे चित्तीं ॥१॥ निवृत्ति निवृत्ति नाम घेतां । जन्म सार्थक तत्वतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निवृत्तिनाथ तीन अक्षरें । सदा जप करी निर्धारें ॥१॥ पूर्वज उध्दरती साचार । वेदशास्त्रीं हा निर्धार ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निःशेष कांहीं नेणिजे । तें शुद्ध ज्ञान म्हनिजे । मा सर्व जें जेणें जाणिजे । तें अज्ञान कैसें बा ॥१॥ ज्ञान तें कवण अज्ञान ते कवण । दोहोंचें लक्षण पाहतें पाहा ॥धृ॥

रचनाकार: संत एकनाथ

निष्ठा ते भजन वाचे नारायण । तया सत्य पेणें वैकुंठीचें ॥१॥ ऐसें वेदशास्त्रें पुराणें सांगतीं । नामें जोडे मुक्ति नारीनरां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नीर मंथुनी मंथन पैं केले । सार असार तें चवीस आलें ॥१॥ ताक तेंहीं गोड दूध देंही गोड । रसनेची चाड पारुषली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नीळवर्ण वृक्ष तो अति दृश्य । पाहतां सावकाश दृष्टी न पडे ॥१॥ भलें कोडें कान्होबा हें तुझें । लय लक्षा न कळे म्हणती माझें आणि तुझें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नेणतां नेणतां कां रे अंध होशी । माझें म्हणविशी कां रे बळें ॥१॥ तूं कोण कोठील आहेसी कोणाचा । शिणतोसी साचा मी माझें म्हणुनी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नेणतिया ठायीं पाहुं जाय देवा । तों अवघें या केशवा व्यापियेलें ॥१॥ नेणतपण गेलें पाहतां पाहणें पडियेलें टक । अवघाचि हरिख वोसंडला ॥३॥

रचनाकार: संत एकनाथ