भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवांतपणें मना चित्तीं तूं चरण । आणिक कल्पना न करीं कांहीं

nivantapanen mana chittin tun charan | anik kalpana na karin kanhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निवांतपणें मना चित्तीं तूं चरण । आणिक कल्पना न करीं कांहीं ॥१॥ चिंतीं पां विठ्ठल कायावाचामनें । संसारबंधन तुटेल तेणें ॥२॥ संसाराची वार्ता नुरेचि पां कांही । आणिकक प्रवाहीं पडुं नको ॥३॥ एका जनार्दनीं विठ्ठलनामीं छंद । मना तूं गोविंद आठवीं कां रे ॥४॥