भजनी मालिका
← भजनांकडे परत

निळी कांच भूमीं खेळे वनमाळी । पाहिलें प्रतिबिंब कृष्णं तया न्याहाळीं

nili kanch bhumin khele vanamali | pahilen pratibimb krushnan taya nyahalin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निळी कांच भूमीं खेळे वनमाळी । पाहिलें प्रतिबिंब कृष्णं तया न्याहाळीं ॥१॥ रडूं घेतलें रडूं घेतलें । समजावी यशोदा परी रडूं घेतलें ॥२॥ दे मज खेळावया भानु । आन नको कांही दुजा छंद मनु ॥३॥ एका जनार्दनीं देव छंद धरी गा । समजावी यशोदा परी न राहे उगा ॥४॥