भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवंत बैसोनि सुखें गाय नाम । भेदाभेद काम परते सांडी

nivant baisoni sukhen gay nam | bhedabhed kam parate sandi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निवंत बैसोनि सुखें गाय नाम । भेदाभेद काम परते सांडी ॥१॥ हेचि एक खुण परमार्थ पुरता । मोक्ष सायुज्यता हातां चढे ॥२॥ लौकिक वेव्हार आहे तैसा पाहे । जो जो होत जाये जे जे वेळ ॥३॥ कर्म धर्म त्तत्त्वतां बीज हें सर्वथा । एका जनार्दनीं पुरता योग साधे ॥४॥