भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेणतां नेणतां कां रे अंध होशी । माझें म्हणविशी कां रे बळें

nenatan nenatan kan re andh hoshi | majhen mhanavishi kan re balen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नेणतां नेणतां कां रे अंध होशी । माझें म्हणविशी कां रे बळें ॥१॥ तूं कोण कोठील आहेसी कोणाचा । शिणतोसी साचा मी माझें म्हणुनी ॥२॥ रहाट माळ जैसी जात येत वरी । तैशीच ये परी जन्म देहीं ॥३॥ एका जनार्दनीं करी कां विचार । वायां हांवभर फिरूं नको ॥४॥