भजनी मालिका
← भजनांकडे परत

निष्ठा ते भजन वाचे नारायण । तया सत्य पेणें वैकुंठीचें

nishtha te bhajan vache narayan | taya satya penen vaikunthichen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निष्ठा ते भजन वाचे नारायण । तया सत्य पेणें वैकुंठीचें ॥१॥ ऐसें वेदशास्त्रें पुराणें सांगतीं । नामें जोडे मुक्ति नारीनरां ॥२॥ भलतिया भावे मुखीं नाम गावें । तयासै राणिवे वैकुंठीचें ॥३॥ एक जनार्दनीं प्रेमाचा पुतळा । विठ्ठल देखिल डोळां धन्य झालों ॥४॥