भजनी मालिका
← भजनांकडे परत

नीळवर्ण वृक्ष तो अति दृश्य । पाहतां सावकाश दृष्टी न पडे

nilavarna vruksha to ati drushya | pahatan savakash drushti na pade

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नीळवर्ण वृक्ष तो अति दृश्य । पाहतां सावकाश दृष्टी न पडे ॥१॥ भलें कोडें कान्होबा हें तुझें । लय लक्षा न कळे म्हणती माझें आणि तुझें ॥२॥ हो वृक्षांची वोळख धरा बरी । निवृत्ति ज्ञानदेव सोपान अधिकारी ॥३॥ एका जनार्दनीं वृक्ष सगुण निर्गुण । जाहला पुंडलिकाकारणे ब्रह्मा सनातन ॥४॥