भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्धारे नेमेंसी करी एकादशी । तृणजीवन पशूंसी घेऊं नेदी

nirdhare nemensi kari ekadashi | trunajivan pashunsi gheun nedi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निर्धारे नेमेंसी करी एकादशी । तृणजीवन पशूंसी घेऊं नेदी ॥१॥ राष्ट्रामाजीं रुढी केली हरिभक्ती । दया सर्वांभूतीं समानची ॥२॥ हरिकीर्तनाच्या भरियेल्या रासी । भेदीत आकाशीं पुण्य जाये ॥३॥ मध्यें आला कांही व्रता अंतराय । अपाय तो पाहे मोहनीचा ॥४॥ एका जनार्दनी होतां स्त्रीसंग । नेमा होय भंग तात्काळीक ॥५॥