भजनी मालिका
← भजनांकडे परत

नुपजे अनुताप ज्ञान । काय घेउनी विज्ञान

nupaje anutap dnyan | kay gheuni vidnyan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नुपजे अनुताप ज्ञान । काय घेउनी विज्ञान ॥१॥ अनुतापाविण । व्यर्थ संन्यास ग्रहण ॥२॥ संन्यास घेतलिया पाठीं । काम नुपजावा पोटीं ॥३॥ ऐसे संन्यास लक्षण । एका जनार्दनीं खुण ॥४॥