भजनी मालिका
← भजनांकडे परत

पतित पातकी खळ दुराचारी । पाहतां पंढरी मोक्ष तयां

patit pataki khal durachari | pahatan pandhari moksha tayan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पतित पातकी खळ दुराचारी । पाहतां पंढरी मोक्ष तयां ॥१॥ स्वमुखं भक्तां सांगतों आपण । नका अनुमान धरुं कोणी ॥२॥ चंद्रभागा दृष्टी पाहतां नरनारी । मोक्ष त्यांचे घरीं मुक्तिसहित ॥३॥ चतुष्पाद पक्षी कीटकें अपार । वृक्ष पाषाण निर्धार उद्धरती ॥४॥ एका जनार्दनीं न घ्यावा संशय । दरुशनें जाय पापताप ॥५॥