भजनी मालिका

भजने

समाधान त्यांचीं इंद्रियें सकळ । जयां तो गोपाळ समागमें ॥१॥ गोविंदाचाझाला प्रकाश भीतरी । मग त्यां बाहेरी काय काम ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

समाधि निवृत्ति म्हणतां । हारे संसाराची व्यथा ॥१॥ दृष्टीं पाहातां निवृत्तिनाथ । काय भय नाहीं तेथ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

समाधि श्रवण करिती निशिदिनीं । त्यांसि चक्रपाणि देईल भेटी ॥१॥ समाधि श्रवणाचा धरील जो विश्वास । नाहीं नाहीं दोष पातकांचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

समाधिस्थ सदा राहे समाधान । नि:शब्द म्हणणें याचिलागीं ॥१॥ राम ते समान नव्हती समाधान । समाधि बै-सणें एकचित्तें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

समाधी परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर । उठविले भार वैष्णवांचे ॥१॥ आळंकापुरीं सव्य घेतली ते संतीं । दिली भागीरथी ज्ञानालागीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

समाधीच्या पाळी वैसलीं सकळीं । केला या गोपाळीं जयजयकार ॥१॥ निवृत्तीच्या संगें पुंडलिक पांडुरंग । सिद्ध जाले सांग समाधीसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

समाधीशी शेज घातली मनोहर । बैसविले वर चांगदेव ॥१॥ आनंदानें टाळया पिटिति वैष्णवाभार । लाविती पदर डोळियासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

समान नीट दोही आंगे पोरा खेळे मुरदांगे । नाहीं तरी जासि वायां चुकवितां आंगें ॥१॥ खेळ सख्या खेळा । लक्षूनि हरी डोळा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

समुद्र क्षोभे वेळोवेळीं । योगिया क्षोभेना कोण्हाकाळीं ॥१॥ समुद्रा भरितें पर्वसंबंधे । योगी परिपूर्ण परमानंदें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

समुद्रवलयांकित तीर्थ । स्नानें करती जे पवित्र । परी तेथें नसतां भाव । निर्फळ वाव होतसे ॥१॥ ऐसा निर्णय शास्त्री । पुराणीं सांगतसे व्यक्ति । तेचि उघड सर्वाप्रती । सांगतसें परियेसा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

समुद्रवलयांकित पृथ्वी पाहतां । ऐसें तीर्थ सर्वथा नाहीं कोठें ॥१॥ भाविकांचें माहेर जाणा पंढरपुर । विठ्ठल विटेवर उभा असे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

समुद्रवळयांकित पृथ्वीचें दान । करितां समान न ये नामा ॥१॥ म्हणऊनि कोणीं न करावा आळस । म्हणा रात्रीदिवस रामराम ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

समुद्राचें पाणि मुंगी मुखांतूनी । काढाया लागोनि श्रम थोडे ॥१॥ केशवाची भक्ति कठीण त्याहनि । वांयां दंभपणीं नोहे नोहे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव