भजनी मालिका
← भजनांकडे परत

समाधी हरीची समसुखेंवीण

samadhi harichi samasukhenvin

समाधी हरीची समसुखेंवीण । न साधेल जाण द्वैतबुध्दी ॥१॥ बुध्दिचें वैभव अन्य नाहीं दुजें । एक्या केशीराजें सकळ सिध्दि ॥२॥ ऋध्दि सिध्दि निधी अवघीच उपाधी । जंव त्या परमानंदी मन नाहीं ॥३॥ ज्ञानदेवीं रम्य रमलें समाधान । हरीचें चिंतन सर्वकाळ ॥४॥