भजनी मालिका
← भजनांकडे परत

समुद्रवळयांकित पृथ्वीचें दान । करितां समान न ये नामा

samudravalayankit pruthvichen dan | karitan saman na ye nama

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
समुद्रवळयांकित पृथ्वीचें दान । करितां समान न ये नामा ॥१॥ म्हणऊनि कोणीं न करावा आळस । म्हणा रात्रीदिवस रामराम ॥ध्रु.॥ सकळ ही शास्त्रें पठण करतां वेद । सरी नये गोविंदनाम एकें ॥२॥ सकळ ही तीर्थे प्रयागादी काशी । करितां नामाशीं तुळेति ना ॥३॥ कर्वतीं कर्मरीं देहासी दंडण । करितां समान नये नामा ॥४॥ तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार । नाम हें चि सार विठोबाचें ॥५॥