भजनी मालिका
← भजनांकडे परत

समाधिसाधनसंजीवन नाम

samadhisadhanasanjivan nam

समाधिसाधनसंजीवन नाम । शांति दया सम सर्वांभूतीं ॥१॥ शांतीची पै शांति निवृत्तिदातारु । हरिनाम उच्चारु दिधला तेणें ॥२॥ शम दम कळा विज्ञान सज्ञान । परतोनि अज्ञान नये घरा ॥३॥ ज्ञानदेवा सिध्दि साधन अवीट । भक्तिमार्ग नीट हरिपंथी ॥४॥