भजनी मालिका
← भजनांकडे परत

समाधि धन्य रामनामें

samadhi dhanya ramanamen

समाधि धन्य रामनामें । आम्हां सर्व कर्मे समे । कृष्ण वाचे नित्य नेमें । जिव्हे पाठ हरिगोविंद ॥ हेची तारक पाठांतर । नित्य समाधीचें घर । शिव शंभुसी निरंतर । जपमाळ सर्वथा ॥ जीवाचे जीवन श्रीहरि । चिंता प्राणीयाची हरी । अंती चतुर्भुज करी । सर्व श्रीहरि माझा तो ॥ ज्ञानदेव सर्वोपरी । यंत्र साधिलें श्रीहरि । वैकुंठीचा विहारी । हदयातरी घातला ॥