भजनी मालिका
← भजनांकडे परत

समाधि श्रवण करिती निशिदिनीं । त्यांसि चक्रपाणि देईल भेटी

samadhi shravan kariti nishidinin | tyansi chakrapani deil bheti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
समाधि श्रवण करिती निशिदिनीं । त्यांसि चक्रपाणि देईल भेटी ॥१॥ समाधि श्रवणाचा धरील जो विश्वास । नाहीं नाहीं दोष पातकांचा ॥२॥ समाधि विरक्ताची पतिता वाराणसी । कोटि कुळें त्याची उद्धरील ॥३॥ जो कोणी बैसेल समाधिश्रवणा । तया प्रदक्षिणा पृथ्वीची हे ॥४॥ स्वहित साधन सांगितलें येथें । परिसा भागवत लेखकु जाला ॥५॥ नामा म्हणे हरि बोलिलों तुझिया बळें । वाहिलीं तुळसीदळें स्वामीलागीं ॥६॥