भजनी मालिका
← भजनांकडे परत

समाधीचें साधन तें रामनाम चिंतन

samadhichen sadhan ten ramanam chintan

समाधीचें साधन तें रामनाम चिंतन । चित्ता सुखसंपन्न । हर्ष जीवनीं केला ॥१॥ कोटी तपाचिया राशीं । जोडती रामनामापाशीं । नाम जपतां अहर्निशीं । वैकुंठपद पाविजे ॥२॥ हेंचि ध्रुवासी आठवलें । उपमन्यें हेंचि घोकिलें । अंबऋषीनें साधिलें । रामकृष्णउच्चारणीं ॥३॥ पांडवांसि सदा काळीं । कृष्ण राहिला जवळी । ज्ञानदेवह्रदयकमळीं । तैसाचि स्थिरावला ॥४॥