भजनी मालिका
← भजनांकडे परत

समाधान त्यांचीं इंद्रियें सकळ । जयां तो गोपाळ समागमें

samadhan tyanchin indriyen sakal | jayan to gopal samagamen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
समाधान त्यांचीं इंद्रियें सकळ । जयां तो गोपाळ समागमें ॥१॥ गोविंदाचाझाला प्रकाश भीतरी । मग त्यां बाहेरी काय काम ॥२॥ काज काम त्यांचें सरले व्यापार । नाहीं आप पर माझें तुझें ॥३॥ माया सकळांची सकळां ही वरी । विषय तें हरी दिसों नेदी ॥४॥ दिसे तया आप परावें सारिखें । तुका म्हणे सुखें कृष्णाचिया ॥५॥