भजनी मालिका
← भजनांकडे परत

समान नीट दोही आंगे पोरा खेळे मुरदांगे । नाहीं तरी जासि वायां चुकवितां आंगें

saman nit dohi ange pora khele muradange | nahin tari jasi vayan chukavitan angen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
समान नीट दोही आंगे पोरा खेळे मुरदांगे । नाहीं तरी जासि वायां चुकवितां आंगें ॥१॥ खेळ सख्या खेळा । लक्षूनि हरी डोळा ॥२॥ सांडूनि मर्यादा जरि घालिसी पाउलें । त‍री होसि फजित पोरा मारितील मुलें ॥३॥ निळा म्हणे चिप चरणे धरुनियां निघ । न पडसी कोडियांत ध्यातां हा श्रीरंग ॥४॥