भजनी मालिका

भजने

अंगाची सेज फणि छाया धरी । सहस्रमुखीं करी स्तुति शेष ॥१॥ परि तयातें तुझें चरित्र आकळीत । तेथें माझें गीत कोणीकडे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अगाध कीर्ति वाढले संत । केली विख्यात चरित्रें हीं ॥१॥ अग्नींत उभे विषचि प्याले । नाहीं ते भ्याले महा शस्त्रा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अगाध चरणाचें महिमान वानितां वेदां पडिलें मौन्य ॥१॥ पुराणें वर्णितां भागलीं सहाशास्त्रें वेडावलीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अगाध जीवनीं मत्स्य ते असती । नाहीं दुःखप्राप्ति तयां कधीं ॥१॥ परि आलिया ढीवर घालितसे गळ । मग तळतळ करुनी काय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अगाध तुझीं लीला आकळ कैसेनी कळे । ब्रह्मा मुंगी धरूनी तुझें स्वरुप सांवळें ॥१॥ तुज कैसे भजावें आपणां काय देखावें । तुजपाशीं राहुनी तुजला कैसें सेवावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अगाध भगवंतांची नामें । अगाध त्यांची जन्मकर्में ॥१॥ शिणले ते वाखाणितां । शेषा न कळें तत्त्वतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अगाध भवजळ तरावया दुस्तर । रची पंढरपूर कली-माजी ॥१॥ तारु पंढरीनाथ मोलेंविण उतरी । उभा भिमातीरीं वाट पाहे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अगाध महिमा तुमचा देवा । काय म्यां वाणावा मूढमति ॥१॥ उगाचि म्हणवीं तुमचा दास । करुनियां आस पायांची ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अगाध महिमा यात्रा कार्तिकिये । आला पंढरीये नामदेव ॥१॥ भक्तां शिरोमणी श्रीपंढरिनाथाअ । कृपाळुवा माता बाळकासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अगाध हे कीर्ति विठ्ठला तुमची । महिमा आणिकांची काय सांगों ॥१॥ पुराणें भागलीं नेति नेति शब्द । श्रुतीचा अनुवाद खुंटलासे ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

अंगासी राख ढूंगासी लंगोटी । गोसावे हातवटी मिरविती ॥१॥ अल्लख म्हणोनि भिक्षा मागताती । अलखाची गती न कळे मूढां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अंगिकार करी तयाचा विसर । न पडे साचार तया लागीं ॥१॥ तो हा महाराज चंद्रभागे तटी । उभा वाळुवंटी भक्तकाजा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा