भजनी मालिका
← भजनांकडे परत

अगाध महिमा पंढरीचा । काय तो वाचा कवळेल

agadh mahima pandharicha | kay to vacha kavalel

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अगाध महिमा पंढरीचा । काय तो वाचा कवळेल ॥१॥ येती यात्रे मुक्त होती । जे या देखती विठठला ॥२॥ नलगे दुजें तपसाधन । घडतां स्नान चंद्रभागे ॥३॥ निळा म्हणे भूमीवरी । क्षेत्र हें पंढरी वैकुंठ ॥४॥