भजनी मालिका
← भजनांकडे परत

अगा रुक्मिणीनायका सुरा असुरा प्रिय लोकां

aga rukmininayaka sura asura priy lokan

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
अगा रुक्मिणीनायका सुरा असुरा प्रिय लोकां ॥१॥ ते तूं धांवें माझे आई सखे साजणी विठाबाई ॥२॥ अगा शिवाचिया जपा | मदन ताता निष्यापा ॥३॥ आपुली म्हणवुनी अपंगावी दासी जनी ॥४॥