भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनी लागतां अंगासी घाबरला हृषीकेशी

ani lagatan angasi ghabarala hrushikeshi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
अनी लागतां अंगासी घाबरला हृषीकेशी ।।१।। निजरूपें प्रगटला चरणीं मस्तक ठेविला ॥२॥ सोनसळा वैजयंती। कोटि सूर्य ते लोपती ।।३।। नामा म्हणे विठोबाला भला अंत रे पाहिला ॥४॥ हातीं धरुनी नामवासी। पाठ थोपटी हृषीकेशी ।।५॥ गेला राउळीं चक्रपाणी। भावें वंदी दासी जनी ॥६॥