भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनंत लावण्याची शोभा तो हा विटेवरी उभा

anant lavanyachi shobha to ha vitevari ubha

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
अनंत लावण्याची शोभा तो हा विटेवरी उभा ॥१॥ पितांबर माळ गांठीं। भाविकांसी पाली मिठी ॥२॥ त्याचे पाय चुरी हातें । कष्टलीस माझे माते ॥३॥ आवडी बोले त्यासी । चला जाऊं एकांतासी ॥४॥ ऐसा ब्रह्मींचा पुतळा । दासी जनी पाहे डोळां ॥५॥