भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनामिक त्यासी पुसे तुमचे भोजनाचे कैसे

anamik tyasi puse tumache bhojanache kaise

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
अनामिक त्यासी पुसे तुमचे भोजनाचे कैसे।।१।। कर संपुष्ट जोडुनी राय विनवी मधुर वचनीं ॥२॥ जेणें निधे तुमचें काम। राखा माझाही स्वधर्म ।। ३॥ नृपा दिलें कोरें अन्न। सुखें करावें भोजन ||४|| धान्य घेऊनियां करीं। राव आला गंगातीरीं ॥५॥ स्नान संध्या नेम सारी। राजा स्वयंपाक करी ॥६॥ गाय अग्रीचा पैं ग्रास ठाव वाढिला धर्मास ||७|| ग्रास घालावा वदनीं। आला विश्वामित्र मुनी ||८|| बैसावें जों भोजनासी अकस्मात् पावे ऋषी ||९|| एक भाग महिला दुमा राजाचा उचलिला ।।१०।। तुम होयोनि ऋषेश्वर उठे देउनी डेकर।।११।। पदर कसुनी कटासी सदा सादर सेवेसी||१२|| निराहार शक्तिहीन दिसे जैसा [क] दीन।।१३।। ऐसा छळी प्रतिदिनी म्हणे नामयाची जनी ||१४