भजनी मालिका
← भजनांकडे परत

अगाध भवजळ तरावया दुस्तर । रची पंढरपूर कली-माजी

agadh bhavajal taravaya dustar | rachi pandharapur kali-maji

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अगाध भवजळ तरावया दुस्तर । रची पंढरपूर कली-माजी ॥१॥ तारु पंढरीनाथ मोलेंविण उतरी । उभा भिमातीरीं वाट पाहे ॥२॥ बुडण्याचें भय नाही पैं संसारीं । कलीमाजी पंढरी थोर नाव ॥३॥ जया नावेवरी अठराही आवलें । साही खण भले मिरवती ॥४॥ चहूंमुखीं जिचा नकळेचि पार । पाहतां विचार सहस्र-मुखा ॥५॥ सडया लावी कसे कुटुंबीं नावेवरी । उतरीलें तीरीं केशि-राजें ॥६॥ प्रेमाचिया पेठीं बांधोनियां पोटीं । उतरी जगजेठी पांडु-रंग ॥७॥ अंगें घाली उडी बुडतिया काढी । ऐसे कल्प कोडी तारियेले ॥८॥ तारियेलें सत्य हाचि पैं निर्धार । नामा पैल पार उतरला ॥९॥