भजनी मालिका
← भजनांकडे परत

अगाध महिमा यात्रा कार्तिकिये । आला पंढरीये नामदेव

agadh mahima yatra kartikiye | ala pandhariye namadev

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अगाध महिमा यात्रा कार्तिकिये । आला पंढरीये नामदेव ॥१॥ भक्तां शिरोमणी श्रीपंढरिनाथाअ । कृपाळुवा माता बाळकासी ॥२॥ धन्य नाचदेव धन्य नामदेव । ह्रदयीं पंढरीराव न विसंबे ॥३॥ प्रेमळ भक्त विळोन अपार । करिताती गजर हरिनामाचाअ ॥४॥ नटयाटय कीर्तन झळकती गरुडटके । करिती ब्रह्मादिक पुष्पवृष्टी ॥५॥ नामघोष श्रवण सकळां समाधान । चुकले जन्म-मरण कल्पकोटी ॥६॥ नामा म्हणे जीव निवाला बा तेथें । पाहातां विठोबातें श्रम गेला ॥७॥