भजनी मालिका
← भजनांकडे परत

अगाधपण माझें अंगी बाणलें वरपडें

agadhapan majhen angi banalen varapaden

अगाधपण माझें अंगी बाणलें वरपडें देखिलें मृत्तिका लिंग ॥१॥ त्यासि चैतन्य नाहीं गुण नाहीं । चळण नाहीं गुण रुप नाहीं ॥२॥ माझ्या शरीरीं ज्योतिर्लिंग उगवलें । अगाध कळविलें हस्तेंविण ॥३॥ बापरखुमादेविवरु ज्योतिर्लिंग विश्वनाथ । तेणें माझा मनोरथ पुरविलागे माये ॥४॥