भजनी मालिका

भजने

नित्यानंदा पुढे आनंद तो कोण । विषयसुख बाई बापुडें तें क्षीण । जेथें न सरेची वैकुंठसदन । शेषशयी वो त्रिकुटभुवन वो ॥१॥ नेघों म्हणोनियां त्यागिती परौतें । घेऊं संगसुख हरीच्या सांगातें । गाऊं वानूं रुप पाहोनि निरुतें । हांसो खेळों ठायीं जेववूं सांगातें वों ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नित्यानंदे घोषें करितां हरीचें कीर्तन । श्रोते आणि वक्ते होती परम पावन ॥१॥ आणिकहि लोक तरती त्यांच्या सहवासें । भाळया भोळया भाविकांसी लाभ अनायासें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

निंदा आणि स्तुति तुझीच करणें । परि आणिकांचे न घेणें गुणदोष ॥१॥ वैर अथवा सख्या तुझियेच । परि न पडो ह्रदयीं विसर तुझा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निंदील कोणी मज तो निंदूं । अथवा स्तुतिवादु करोत सुखें ॥१॥ परि मी गाईन पंढरीनाथा । गुण तत्त्वतां तुमचेचि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

निंदील हें जन सुखें निंदू द्यावें । सज्जनीं क्षोभावें नये बापा ॥१॥ निंदा स्तुति ज्याला समान पैं झाली । त्याची स्थिति आली समाधीला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निद्रिस्थ सकळ तये वनीं व्याळ । गिळितसे बळें नंदालागीं ॥१॥ कृष्णा धांव वेगीं मज गिळी सर्प । काळावरी दर्प तुझा देवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निपुण म्हणती हा आमुचा गुरु । ज्ञानी म्हणति हा परात्परु । योगी म्हणती योग साचारु । याचिपासुनी जन्मला ॥१॥ याज्ञिक म्हणती भासे कृष्ण । यज्ञरुपीं हा नारायण । वैदिकांही लागले ध्यान । म्हणती वेद मूर्तिमत हाचि दिसे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

निबलोण करुं पंढरीया सुखा । आणि पुडंलिका भक्तराया ॥१॥ परलोकींचे येती परतोनि मागुती । सर्व सुख येथें पहावया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निंबलोण करूं पंढरीच्या सुखा । आणिक पुंडलीका मायबापा ॥१॥ पाहतां भूमंडळीं नाहीं आणिक रे । पांडुरंग क्षेत्रा वांचूनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

निमालें राहिलें गेले ऐसे म्हणती । वायां फजीत होती आपुल्या मुखें ॥१॥ नासलें कलेवर घेऊनियां मांडीं । वाउगे तें तोंडी बोलताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

निमासुर वदन । शंखचक्राकित भूषण । शोभवते राजीवनयन । राधेजवळी ॥१॥ नवल मांडिलें विंदान । वेदां न कळे महिमान । वेडावली दरुशने । न कळे तयां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ